Tuesday, April 19, 2011

भारतीय संस्कृतीचे रक्षण काळाची गरज
भारतात गेल्या काही दिवसांपासून पाश्चात्य संस्कृतीचा पगडा गडद होत आहे.पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण झपाट्याने होत असतांनाच ,समाजात अराजकता माजली आहे.शिवाय,व्याभिचारही बोकाळला आहे,वस्तुस्थितीत आजच्या घडीला पाश्चात्यांनाही भारतीय संस्कृतीची भूरळ पडायला लागली आहे.भारतीय संस्कृतीतील योग आणि सणांचा पाश्चात्यही अंगिकार करीत आहेत.इतकेच नव्हे तर ऎतिहासिक महत्त्व असलेल्या या संस्कृतीला विज्ञानाची सांगड असल्याचेही सिध्द झाले आहे.त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीचा अट्टाहास कशासाठी?असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.भारतीय समाजात झपाट्याने होत असलेल्या अंधानुकरणामुळे समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पाश्चात्य संस्कृतीमूळे भारतीय समाजात दुफळी निर्माण होत असल्याने भारतीय समाज घरा-घरात व गटा-गटात विभागला गेला आहे.पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतांना आम्ही आमचे आदर्श राष्ट्रपुरूष आणि इंग्रजांना तसेच परकीयांना सळो की पळो करणारया मातृशक्तीलाही विसरलो आहोत.राष्ट्रमाता मॉं जिजाऊ,क्रांतिकारी अहिल्याबाई होळकर,राणी लक्ष्मी,राणी झांसी,राणी तारामणी,रमाबाई आंबेडकर,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले,राणी दादी,डॉ.आनंदीबाई जोशी,कल्पना चावला व यांसोबतच मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद,महाराणा प्रताप,शाहू महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरूषांचाही आम्हाला विसर पडला आहे.भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर आदर्शच नव्हे तर महान असल्याचा प्रत्यय ठायी ठायी येत आहे.भारतीय संस्कृतीतील आदर्श पुरूष प्रभू रामचंद्र यांच्या कल्पक्तेचा आजच्या घडीला परिचय येत आहे.असं म्हणतात...जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी-मात्र या ऎतिहासिक ऒळीचाही आजच्या मातृशक्तीला विसर पडला आहे.समाजातील मातृशक्ती क्षणिक भौतिक सुखासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत असल्यामुळे समाजातील अनेक पिढ्या नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे.आदिमाया...पार्वती...लक्ष्मी..सरस्वतीच्या अंश असलेल्या मातृशक्तीने आपल्या मुलींच्या संरक्षणासाठी त्यांना भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्टये असलेली वस्त्रे परिधान करण्याचा आग्रह करावा.संस्कृती विघातक कृत्य टाळण्यासाठी आजच्या युवतींनी संकल्प करून अंगप्रदर्शन करणारी वस्त्रे टाळावीत.आधुनिक फैशनच्या नावावर बोकाळलेल्या संस्कृतीने आजच्या नवयुवतींवर अनेक प्रकारचे संकट येत आहेत.आधुनिक युगातील तंत्रज्ञानाला सर्वस्व मानत आम्ही त्यामागे धावत आहोत.परंतू,भारतीय संस्कृतीला विज्ञानाची सांगड होती,हे कदापी विसरून चालणार नाही.विज्ञान व तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी श्रध्दा व आस्था यालाही तेवढेच महत्त्व आहे.यासाठी संस्कारांची गरज आहे. व म्हणून भारतीय संस्कृतीचे संस्कार करून धर्मरक्षण करा व भारत देशाची प्रगती करून या लढ्यात सहभागी व्हा.जय महाराष्ट्र!