Saturday, April 23, 2011

जीवन

जीवन
जीवनात सगळंच मनासारखं मिळत नसतं
तरीसुध्दा आपल्याला जगायचं असतं
कोण बाबा,कोण भाऊ
एकटेच आलोत,एकटेच जाऊ
तरीसुध्दा नात्यांना जपायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं॥१॥
दु:ख जास्त,सुख कमी असतं
म्हणूनच दु:खांना सवंगडी करायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं
जग वाईट आहे,हे आपल्याला माहीत असतं
पण त्याला बदलणही अशक्य असतं
म्हणून प्रत्येक क्षणाला तडजोड करायला शिकायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं॥२॥
सगळच जग वाईट आहे,असही काही नसतं
फक्त आपल्याला चांगल-वाईट ओळखायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं॥३॥
आयुष्यात फक्त जगायचं नसतं
तर कुणासाठी तरी उपयोगी पडायचं असतं
जीवनात आपल्याला काहीतरी करायचं असतं
एवढे करून सुध्दा हे जग कधी ना कधी सोडायचं असतं
म्हणूनच आपल्याला जगायचं असतं॥४॥