Wednesday, June 1, 2011

सुविचार,मित्र-मैत्री,नशिब

सुविचार


1)दान केल्याने आजवर कोणीही गरीब झाला नाही.
2)जीवनात थांबला तो संपला.
3)जो काम करतो,त्याचे नशीबही कामाला लागते.
4)आत्मविश्वासारखी दुसरी दैवी शक्ती नाही.
5)पूर्व ग्रहाची होळी करा,स्वच्छ मनाने कार्यारंभ करा.
6)कृतज्ञता जेथे संपते तेथे माणुसकीही संपलेली असते.
7)टाकाऊचे टिकाऊ करा,टिकाऊ ते विकसित करा.
8)अपयशाला भिऊ नका,प्रगती खुंटते.
9)विद्वतेवरून मनुष्याची उंची ठरत असते.
10)धडपड व सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली.
11)नैतिक जबाबदारी व अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
12)कर्तव्य कर्म हाच खरा धर्म.
13)मी जिंकेल हे मनोमनी जाणणाराच नेहमी यशस्वी होतो.
14)जिवन हा बुध्दी चातुर्याचा समुद्र आहे.
15)साक्षरता ही मानवतेचे प्रतिष्ठान आहे.
16)अणुस्फोटापेक्षाही विनाशकारी आहे लोकसंख्येचा प्रस्फोट.
17)जी माणसं नकोशी वाटतात तीच संपर्कात येतात.
18)एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
19)शरीर सेवेत,धन धर्मात आणि मन परमार्थात असावे
20)संकटे माणसाला आत्मपरिक्षण करण्याची संधी देतात.


मित्र-मैत्री
दृष्टांची मैत्री आरंभी मोठी व नंतर कमी होणा~या सकाळच्या सावली प्रमाणे असते व सज्जनांची मैत्री ही आरंभी लहान व नंतर सतत वाढणा~या दुपारच्या सावली सारखी असते.वैभवकाळात व संकटात जो सारखा वागतो तोच खरा मित्र होय. पापाचरणापासून परावृत करणारा,योग्य हिताचा सल्ला देणारा,संकटात सहाय्य करणारा,गुप्त गोष्टीवर पांघरूण घालणारा "समित्र" होय.


नशिब
जी माणसं हवीशी वाटतात
ती माणसं भेटत नाहीत...
जी माणसं नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही....
ज्यांच्याकडे जावसं वाटतं
त्यांच्याकडे जायला जमत नाही....
ज्यांच्याकडे जाऊ नये असं वाटतं
त्यांच्याकडे जावचं लागतं.....
जेंव्हा जीवन नकोस वाटतं
तेंव्हा काळ संपत नाही...
जेंव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो.....
"नशिब"हे असंच असतं
त्याच्याशी जपूनच वागाव लागतं....
तिथे कोणाचेच काही चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावचं लागतं.....


देश हा देव असे माझा
देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या हातुन तेजोमय पूजा॥
चंदन व्हावा देह केवळ
भावफुलांची भरूनी ओंजळ
प्राणज्योतीने ओवाळिन मी देवांचा राजा॥१॥
धन्य अशा या समर्पणाने 
या जन्माचे होईल सोने
मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुज्ञा॥२॥