Sunday, October 2, 2011

माहूरगड रेणुका मातेची आरती


माहूरगड रेणुका मातेची आरती


ही आदिमाया जगदंबा।रेणूका कुलस्वामीनी अंबा॥धृ॥
जागृत करुनी निरंकारा।निर्गूण आणिले साकारा॥
त्रिविध गुण लावूनी संसारा।रचिला जगडंबर सारा।
भू:जल तेज गगनवारा।बहु तत्वांच्या परिवारां॥
उत्पत्ती स्थिती संहारा।लाविले हिने विधी हरिहरा॥
(चाल)करुनी परिणाम,केले निर्माण,जगाचे प्राण,
सकळही सृष्टी मुळारंभा।रेणूका कुलस्वामिनी अंबा ॥१॥


दुर्लभ जय देवासी दिला।दुर्जय महिषासूर वधिला।
रक्ते क्षितीपट रंगविला।सहस्त्रार्जून घट भंगविला॥
कटकट लावूनी लंकेला।कुलासह राक्षस क्षय केला।
द्रुपदपुरी जाहली याज्ञसेनी।करुनी वीर विरहित अवनी॥
(चाल)उतरला भार,लागेना पार,शौर्य अपार,
सुरवर मानिती अचंबा।रेणूका कुलस्वामिनी अंबा ॥२॥


रेणु राजाची दुहितां।अति सुंदर कनक रूपलता।
श्री जमद्ग्नीची वनीता।त्रिभुवन जन पावन सरितां॥
भार्गवरामाची माता।जिचे गुण वर्णू न शके धाता॥
सकळमूळ सौख्याची खाणी।सकळ मूळ दु:खाची हानी॥
(चाल)प्रगटली धरणी,भर्वार्णव तरणी,कलीमल हरणी,
दुर्घट संकट विटंबा।रेणूका कुलस्वामिनी अंबा ॥३॥


उत्तम मूळ पीठ रम्य स्थळ।वसती देव ऋषी सकळ॥
वाहे अमृततुल्य जळ।प्राशिता होती श्रम सफळ॥
बैसली सिंहासनी अढळ।सदा सुप्रसन्न मुखकमळ॥
जोडूनी विष्णूदास पाणी।प्रार्थुनी म्हणे दिनवाणी॥
(चाल)दाखवी पाय,पाहसी काय,कोटी अन्याय,
क्षमाकरी न करी विलंबा।रेणूका कुलस्वामिनी अंबा॥४॥No comments:

Post a Comment