Thursday, April 28, 2011

सत्य साईबाबा यांची महासमाधी

सत्य साईबाबा यांनी घेतली पुट्ट्पुर्थी येथे महासमाधी.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

Saturday, April 23, 2011

गजानन महाराज

आरती श्री गजानन महाराजांची


जय जय सत्-चित् स्वरूपा स्वामी गणराया।अवतरलासी भूवरी जड-मूढ ताराया॥धृ॥
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी।
ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी।
लीलामात्रे धरिले मानव देहासी॥१॥
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा।
करूनी "गणि गण गणात बोते"या भजना।
धाता हरिहर गुरूवर तूचिं सुखसदना।
जिकडे पहावें तिकडे तूं दिससी नयना॥२॥
लीला अनंत केल्या बंकट सदनास।
पेटविलें त्या अग्नीवांचूनि चिलमेस।
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥३॥
व्याधि वारुन केले कैका संपन्न।
करविलें भक्तांलागी विठ्ठल-दर्शन।
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन॥४॥
गजानन महाराजांचे भजन
गण गण गणात बोते।हे भजन प्रिय सद्गुरुतें।
या श्रेष्ठ गजानन गुरुतें।तुम्ही आठवित रहा यातें।
हे स्तोत्र नसे अमृत तें।मंत्राचि योग्यता यातें।
हे संजिवनी आहे नुसतें।व्यावहारिक अर्थ न याते।
मंत्राचि योग्यता कळते।जो खराच मांत्रिक त्यातें।
या पाठे दु:ख ते हरतें।पाठका अति सुख होतें।
हा खचित अनुग्रह केला।श्रीगजाननें तुम्हाला।
घ्या साधून अवघे याला।मनिं धरून भावभक्तीला।
कल्य़ाण निरंतर होई।दु:ख ते मुळी नच राही॥
असल्यास रोग तो जाई।वासना सर्व पुरतिलही।
आहे याचा अनुभव आला।म्हणूनिया कथित तुम्हाला॥
तुम्ही बसुन क्षेत्र शेगांवी।स्तोत्राची प्रचिती पहावी।
ही दंतकथा ना लवही।या गजाननाची ग्वाही॥


गजानन महाराजांची भूपाळी
उठा उठा हो सद्गुरुराया सरली ती राती॥दयाळा॥
उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती॥धृ॥
सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती॥
गेला होऊन अति आनंदित तें मी वानुं किती॥१॥
उलुक पिंगळे झाले भयभित पाहून अरुणाला।
प्राचि प्रांत तो सद्गुरुराया लालिलाल झाला॥२॥
चक्रवाक चंडोल पक्षि ते प्रभात कालाला।
सूर्या बघण्या आतुर होऊनि घालिती घिरट्याला॥३॥
तेवीं बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी।
दर्शन देउनि तयास तारा गणु म्हणे संसारी॥४॥

जीवन

जीवन
जीवनात सगळंच मनासारखं मिळत नसतं
तरीसुध्दा आपल्याला जगायचं असतं
कोण बाबा,कोण भाऊ
एकटेच आलोत,एकटेच जाऊ
तरीसुध्दा नात्यांना जपायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं॥१॥
दु:ख जास्त,सुख कमी असतं
म्हणूनच दु:खांना सवंगडी करायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं
जग वाईट आहे,हे आपल्याला माहीत असतं
पण त्याला बदलणही अशक्य असतं
म्हणून प्रत्येक क्षणाला तडजोड करायला शिकायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं॥२॥
सगळच जग वाईट आहे,असही काही नसतं
फक्त आपल्याला चांगल-वाईट ओळखायचं असतं
कारण आपल्याला जगायचं असतं॥३॥
आयुष्यात फक्त जगायचं नसतं
तर कुणासाठी तरी उपयोगी पडायचं असतं
जीवनात आपल्याला काहीतरी करायचं असतं
एवढे करून सुध्दा हे जग कधी ना कधी सोडायचं असतं
म्हणूनच आपल्याला जगायचं असतं॥४॥

Friday, April 22, 2011

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!


श्री दत्तात्रेयांची पवित्र तिर्थक्षेत्रे


दत्त तिर्थक्षेत्रे
श्री दत्तात्रेय प्रभू आणि त्यांनी मनुष्य रूपामध्ये घेतलेल्या अवतारांची प्रमुख मुळ दत्त तिर्थक्षेत्रे

१) माहूर(नांदेड)महाराष्ट्र (MAHUR)
- हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला.हे क्षेत्र फार प्राचीन आहे.ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांतीस्थान सुध्दा म्हणतात.ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ शक्ती पीठ सुध्दा आहे.हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते.नांदेड पासून ११० किमी अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे.पुण्या,मुंबई कडील भक्तांसाठी औरंगाबाद,जालना,मेहकर,वाशीम,पुसद,माहूर अशी सरळ बससेवा आहे.नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास आहे.
---------------------------------------------------------------------------------
२)गिरनार(जुनागड)(सौराष्ट्र गुजरात) (GIRNAR)
-हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरापासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला.हे स्थान उंच पर्वतावर असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात.ह्या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत.इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो.या ठिकाणी जाण्यासाठी सुरत,बडोदा,अहमदाबाद या शहरातून जुनागड(गिरनार)साठी नियमीत बससेवा आहे.रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत,अहमदाबाद,राजकोट,जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.या ठिकाणी
राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.
---------------------------------------------------------------------------------
३)पिठापूर-(पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश (PITHAPUR)
-हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे.या क्षेत्रास पादगया सुध्दा म्हणतात.आंध्रप्रदेशमधे पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्याजवळ हे क्षेत्र आहे.आपस्तंब शाखेतील
आपलराज,आणि सुमती माता या ब्राह्मण दांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला.सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली.त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला.जीवनात एक वेळेस या क्षेत्रास जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे.हैद्राबाद,विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते तिथे उतरून रिक्षा अथवा बसने (१०किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला जाता येते.या ठिकाणी जाण्यासाठी
सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वे आहेत.शिर्डी,विशाखापट्टनम,काकिनाडा एक्सप्रेस या रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई-भुवनेश्वर(कोणार्क एक्सप्रेस),तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा-पुरी एक्सप्रेस ही ह्या रेल्वेगाडया सोयीच्या आहेत.या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.पिठापूरला जाणारया भक्तांनी १५ दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची तारिख संस्थानला फोनने कळ्वावी.जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळ्ण्यास अडचण निर्माण होणार नाही.

श्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम पिठापूरम- फोन नं.-(०८८६९) २५०३००,२५२३००.
--------------------------------------------------------------------------
४)कुरवपूर(जि.रायचूर)कर्नाटक (KURAVPUR)
-हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे.या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले.श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.मुंबई,बंगलोर(व्हाया गुलबर्गा)या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते.तिथे उतरून रायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३०किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो.होडिने १ किमी प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते.दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते.नंतर होडिने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचता येते.हा मार्ग अधिक सोयीचा आहे.पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा~यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे.वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे.याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत.याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा~यांना
भोजनासाठी आधी सांगावे लागते.
वासुदेव भट्ट पुजारी,श्री क्षेत्र कुरवपूर,जि.रायचूर.फोन नं.-(०८५३२-२८०५७०)
मोबाईल नं.-०९७३१८२७५४६,०९७४०३१३८२८
---------------------------------------------------------------------------------
५)कारंजा(दत्त)(वाशिम)महाराष्ट्र (GURUMANDIR KARANJA)
-हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी)यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता.त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे.इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत.श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.वाशीम,अमरावती,अकोला,यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० किमी अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बससेवा आहे.मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशन वर उतरून बसमार्गाने ३० किमी अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते.इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.

गुरुमंदिर कारंजा- फोन-(०७२२६) २२४७५५, २२२४५५
----------------------------------------------------------------------------


६)नृसिंहवाडी-(कोल्हापूर,महाराष्ट्र)-हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षांपूर्वी वसले असून सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळ्खले जाते.श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री १२ वर्षे राहिले.आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत.त्यापैकी गुरुचरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे.(नृसिंह वाडी पैलतीरी)बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन परत आणली त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे.कृष्णानदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे परमप्रिय शिष्य श्री नृसिंह सरस्वती (दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर,वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणीमंदिर आहे.त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णानदीवर सुंदर घाट बांधला आहे. नृसिंह वाडीला गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे.हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस ५० किमी. अंतरावर आहे.सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे.सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली-कुरूंदवाड बसने सुध्दा इथे जाता येते.सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे.दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे.काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी "वेदभवन"या वास्तुचे निर्माण केले आहे. ही वास्तु सुध्दा अवश्य पाहावी.
श्री नृसिंह सरस्वती दत्त संस्थान,श्रीनृसिंहवाडी,तालुका शिरोळ,जिल्हा कोल्हापूर फोन-(०२३२२),२७००६४,२७०००६,२७०५०१
-------------------------------------
७)औदुंबर-(सांगली,महाराष्ट्र)-सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे.श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे.या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते.कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरुचरित्राच्या १७व्या अध्यायात आलेली आहे.याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी,श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले..याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुउजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल.त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील,असे वचन दिले.औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे.सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते.तासगाव-कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे.रेल्वे मार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे,कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते.त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते.या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचे घरी सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान औदुंबर तालुका पुलुस जिल्हा सांगली फोन रामभाऊ पुजारी (०२३४६)२३००५८,९९७०१२९७१३,
-------------------------------------------
८)गाणगापूर(गुलबर्गा,कर्नाटक)-गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे.भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे.या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून,यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे.या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.दत्त भक्तांची अशी भावना आहे की,आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात.येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे  फार महत्त्वपूर्ण आहे.मुंबई-हैद्राबाद(व्हाया सोलापूर)किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते.तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० किमी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते.बसमार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बससेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान गाणगापूर फोन नं-(०८४७२)२७४३३५,२७४७६८
---------------------------------------------
९)माणिकनगर(बिदर,कर्नाटक)-सोलापूर-हैद्राबाद बसमार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे.कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते.सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे.रामनवमीच्या दिवशी सव्यं सद्गुरु दत्तप्रभुंनी बयाबाईंना(माणिकप्रभूंची आई)दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेइल असा आशिर्वाद दिला.२२ डिसेंबर १८१७ साली(मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी)दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला.माणिक नगर,बसवकल्य़ाण ,बिदर या परिसरामध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत.त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते.त्याचप्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते.त्यांचे एक वैशिष्टय होते की,त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते.श्री माणिकप्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते.त्यांचा एकमेकांचा आपसात परिचय होता.त्यांच्या नेहमी भेटी होत असत.श्री माणिक प्रभूंनी सकलसंत संप्रदायाची स्थापना करुन १९व्या शतकाच्या मध्यकाळामध्ये या महान देशाच्या मध्यकाळामध्ये एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन,निजाम इलाका)हिंदी समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला.पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा उद्घोष केला व महात्मा गांधीनीही हेच तत्व अंगीकारून आपली राष्ट्रीय ऎक्याची इमारत रचली.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की,ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे.माणिक प्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे.अंधशाळा,वेदपाठ शाळा,पब्लिक स्कूल,संगीत विद्यालय,संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिक प्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो.असे दत्त अवतारी पुरुष मार्गशीर्ष शुध्द एकादशी सन १८६५ मध्ये माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये लीन झाले.हे क्षेत्र सोलापूर पासून १४० किमी अंतरावर आहे.गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हुमानाबादसाठी(माणिकनगरसाठी)नियमित बससेवा आहे.बीदर पासून ४० किमी आणि गुलबर्गापासून ६५ किमी अंतरावर हुमनाबाद (माणिकनगर)आहे.या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास असून दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.श्री माणिक प्रभू संस्थान,माणिकनगर ता.हुमनाबाद जि.बिदर फोन(०८४८३-२०३२४२)०९४४८४६९९१३
-----------------------------
१०)अक्कलकोट(सोलापूर,महाराष्ट्र)-अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्दपुरुष होते.पंजाब राज्यात पानिपत जवळ छेली या खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली.त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला.त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली.३००वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले.एका लाकूड तोड्याने झाड तोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला.त्यामूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले.फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळ्वेढ्यास आले.तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले.अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते.त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे.त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे.त्यावेळचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अल्कार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटन मध्ये गेल्यावर असे जाहीर केले की,आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहे.स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजता समाधी घेतली.अक्कलकोट हे सोलापूरपासून ३५ किमी.अंतरावर आहे.सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे.इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट,अक्कलकोट,जि.सोलापूर(०२१८१)२२०३२१,भक्त निवास-२२१९०९.
-----------------------
११)माणगाव(सिंधुदुर्ग,कोकण महाराष्ट्र)-योगीराज प.पु.वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांचे हे जन्मगाव.दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ.रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४) रोजी माणगावी स्वामीचा जन्म झाला. ते दत्त अवतारी सिध्द पुरुष होते.कारण गणेश शास्त्रींना गाणगापूरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता.श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ.स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला .त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही.त्यांना सर्व विद्या अवगत होत्या.श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य,मंत्रसिध्द,यंत्र-तंत्रज्ञ,उत्कृष्ट ज्योतिषी,मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी,वक्ते,हठयोगी,उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते.एकच खंत वाट्ते की,त्यांना संसार सुख लाभले नाही.जन्मताच मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते.पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला.स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या.अशा महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४मधे समाधी घेतली.माणगाव हे क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे.सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा लागतो.तिथे उतरून बस मार्गाने ७ किमी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते.सावंतवाडीसाठी कोल्हापूरवरून नियमीत बससेवा आहे.या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.(दत्त मंदिर,माणगाव,ता.कुडाळ,जि.सिंधुदूर्ग कोकण फोन नं.०२३६२-२३६२४५,२३६४२५)
-------------------------------
१२)श्री क्षेत्र कडगंची(गुलबर्गा,कर्नाटक)-वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले.हे स्थान प्रसिध्दीस नव्हते.परंतु आता श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.गाणगापूरपासून ३४ किमी.अंतरावर हे पुण्य स्थान आहे.सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता.त्याच्याच ५व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला.श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय.गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनामधारक संवादे असा उल्लेख आहे.त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय.सायंदेवाचे घराचे जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे.येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते.श्री सायंदेव दत्त देवस्थान ट्रस्ट समिती कडगंची,ता.आळंद,जि.गुलबर्गा,कर्नाटक.फोन नं.-०८४७७-२२६१०३,९७४०६२५६७६
------------------------------
१३)मंथनगड(मंथनगुडी)महेबुब नगर(आंध्रप्रदेश)-श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरव्पूरला नवस फेडण्यासाठी जात असता याच ठिकाणी चोरांनी त्त्यास अडवून त्याची हत्या केली.त्यामूळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले,तेच हे ठिकाण हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून हे क्षेत्र १० किमी.अंतरावर आहे.मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात.मतकल-नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथन गड येथून जातात.श्री क्षेत्र कुरवपुरला मतकल मार्गे जातांना अगर येतांना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन घ्यावे.
-------------------------
१४)गरुडेश्वर(नर्मदा,गुजरात)-हे क्षेत्र गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात येते.सुरत-अहमदाबाद या बस मार्गावर अंकलेश्वर हे गाव लागते.तिथे उतरून बस मार्गाने राजपिपला मार्गे गरुडेश्वर ६८ किमी अंतरावर आहे.राजपिपला हे तहसीलचे गाव आहे.शिरपूर-बडोदा,धुळे-बडोदा या बसेस राजपिपला मार्गे बडोद्याला जातात.त्यामुळे महाराष्ट्रातून गरुडेश्चरला जाणारया भक्तांसाठी शिरपूर किंवा धूळे येथून जाणे सोयीचे पडते.या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे.हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे.सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे.नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे.एक अपत्य झाल्यावर पत्नीसह बालकाचे निधन झाले.समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्त अवतार असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात अव्यक्त केला.असे महान योगी सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत विलीन झाले.दत्त संप्रदायामधे स्वामींचे नाव आदरने घेतले जाते.याठिकाणी निवासासाठी भक्तनिवास व दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे.(दत्त संस्थान,गरुडेश्वर.जि.नर्मदा,गुजरात फोन-०२६४०-२३७००५,२३७०६५)
-------------------------------------
१५)कर्दळीवन-आपल्या अवतार समाप्ती नंतर श्री नृसिंह सरस्वती याच कर्दळीवनात गुप्त झाले व येथेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. Wednesday, April 20, 2011

उपयुक्त महिती

 *शून्य*
१. निराकार चैतन्यस्वरूप.
 *एक*
१.एक आत्मा-जगदात्मा
२.एक परब्रह्म-अद्वितीय
३.एक मूळ प्रकृती-आदिमाया
४.एक विराट रूप-विश्वरूप.
*दोन*
दोन ग्रहणे-१.चंद्रग्रहण २.सूर्यग्रहण
दोन महाकवी-१.वाल्मिकी २.महर्षी व्यास
दोन महाग्रंथ-१.रामायण २.महाभारत
*तीन*
त्रिमूर्ती-१.ब्रह्मा २.विष्णू ३.महेश
त्रिकांड-१.कर्म २.ज्ञान ३.उपासना
तीन गुण-१.सत्व २.रज ३.तम
तीन तत्वे-१.मन २.बुद्धी ३.अहंकार
त्रिवेणी संगम-१.गंगा २.यमूना ३.सरस्वती
त्रिस्थळी यात्रा-१.प्रयाग(उत्तर-प्रदेश) २.काशी(उत्तर-प्रदेश) ३.गया(बिहार)
तीन काळ-१.वर्तमानकाळ २.भूतकाळ ३.भविष्यकाळ
तीन भूवने-१.स्वर्ग २.मृत्यू ३.पाताळ
तीन ऋणे-१.देवऋण २.ऋषीऋण ३.पितृऋण
ऋषींचे तीन प्रकार-१.ब्रह्मर्षि २.देवर्षि ३.राजर्षि
*साडे तीन*
साडे तीन मुहूर्त-१.गुढीपाडवा.२)विजयादशमी(दसरा) ३.अक्षयतृतीया ४.बलिप्रतिपदा(अर्धा मुहूर्त)
देवीची साडेतीन पीठे-१.तुळजाभवानी २.महालक्ष्मी ३.रेणूका माता ४.सप्तशृंगी(नाशीक) अर्धे पीठ.


*चार*
चार योग-१.कर्मयोग २.भक्तीयोग ३.राजयोग ४.ज्ञानयोग
चार वेद-१.ऋग्वेद २.यजुर्वेद ३.सामवेद ४.अथर्ववेद
चार युगे-१.कृतायुग(कार्तिक शुद्ध नवमीस प्रारंभ)
        २.त्रेतायुग(वैशाख शुद्ध तृतीयेस प्रारंभ)
        ३.द्वापारयुग(माघ वद्य अमावास्येस प्रारंभ)
        ४.कलियुग(भाद्रपद वद्य त्रयोदशीस प्रारंभ)
चातुर्मास-आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध द्वादशी मधला काळ.

श्री क्षेत्र पिठापूर येथे कसे जावे? याबद्दल मार्गदर्शन
HOW TO REACH PITHAPUR?
RAILWAY TIME-TABLE FOR PITHAPUR IN MARATHI
पिठापूर येथे जाण्यासाठी रेल्वेमार्गाची माहिती
पिठापूरला जाण्यासाठी रेल्वेमार्गाने"सामलकोट"आंध्रप्रदेश या जंक्शनवर उतरावे.
सामलकोटला जाणारया व येणारया  "रेल्वे गाडया"


योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी रिझर्वेशन करण्याआधि रेल्वे विभागकडून खात्री करून घ्यावी.
TO SEE THE RAILWAY TIME TABLE OF PITHAPUR IN TABULAR FORM,CLICK HERE.
पिठापूर रेल्वे वेळापत्रक टेबलच्या स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्र.
गाडीचे नाव
गाडी नंबर
गाडी सुटण्याचे ठिकाण व वेळ
गाडी पोहोचण्याचे ठिकाण व वेळ
कोणत्या जिल्ह्यासाठी उपयुक्त

1) मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस(सामलकोट पर्यंत टिकीट काढणे,मार्ग-पुणे,सोलापूर-सिकंदराबाद,विजयवाडा,राजमुंद्री-सामलकोट)
11019 मुंबईवरून रोज दुपारी ३:१० वाजता व्ही.टी.स्टेशनवरून सुटते.
दुसरया दिवशी ५:२०ला(सायंकाळी) सामलकोटला पोहोचते.
मुंबई,रायगड,पुणे,अहमदनगर,
सोलापूर,बीड,
उस्मानाबाद

2) भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस(टिकीट सामलकोट येथून काढणे) प्रवास-२६ तास

11020 सामलकोट येथून रोज रात्री १२:५६ वा.सुटते
पुण्याला रात्री ११:३० वाजता व मुंबईला पहाटे ३:३०(दुसरया दिवशी)पोहोचते.
मुंबई,रायगड,पुणे,अहमदनगर,
सोलापूर,बीड,
उस्मानाबाद

3) मनमाड-विशाखापट्टनम काकीनाडा टाऊन एक्सप्रेस,(मार्ग-औरंगाबाद-परभणी-बिदर-सिकंदराबाद-विजयवाडा-राजमुंद्री-सामलकोट)
11405 दर गुरुवारी व रविवारी संध्याकाळी ७:०० वाजता मनमाड येथून निघते
दुसरया दिवशी संध्याकाळी ७:४० वाजता सामलकोट येथे पोहोचते.
नाशिक,धुळे,जळगाव,नंदूरबार,मराठवाडा,नगर.

4) विशाखापट्टनम-मनमाड एक्सप्रेस,(मार्ग- सामलकोट-राजमुंद्री-विजयवाडा-सिकंदराबाद-बिदर-परभणी-औरंगाबाद)
11406 दर बुधवारी व शनिवारी सकाळी ६:१५ वाजता काकीनाडा येथून सुटते.
दुसरया दिवशी सकाळी ७:३० वाजता मनमाड येथे पोहोचते.
नाशिक,धुळे,जळगाव,नंदूरबार,मराठवाडा,नगर.

5) मनमाड-काकिनाडा टाऊन एक्सप्रेस(मार्ग-औरंगाबाद,जालना,परभणी,बिदर,सिकंदराबाद,राजमुंद्री,सामलकोट)
17205 फक्त दर मंगळवारी संध्याकळी ७:०० वाजता मनमाड येथून निघते.
दुसरया दिवशी संध्याकाळी ७:४० ला सामलकोटला पोहोचते.
नाशिक,धुळे,जळगाव,नंदूरबार,मराठवाडा,नगर
6) काकिनाडा टाऊन-मनमाड एक्सप्रेस(मार्ग-सामलकोट-विजयवाडा-सिकंदराबाद-बिदर-परभणी-औरंगाबाद)
17206 फक्त दर सोमवारी सकाळी ६:१५ वाजता काकिनाडा येथून निघते.
दुसरया दिवशी सकाळी ७:३० ला मनमाडला पोहोचते.
नाशिक,धुळे,जळगाव,नंदूरबार,मराठवाडा,नगर
7) भावनगर-काकिनाडा टाऊन एक्सप्रेस(मार्ग-भावनगर,वसई,कल्याण,पुणे,सोलापूर,सिकंदराबाद,विजयवाडा,सामलकॊट)
17206 फक्त दर शनिवारी पहाटे ४:१०वा.भावनगर येथून निघते.संध्या ७:४० कल्य़ाण,रात्री १०:३० पुणे)
सामलकोटला रविवारी संध्याकाळी ८:५० वाजता पोहोचते.
पुणे,मुंबई,सोलापूर,उस्मानाबाद,रायगड

8) काकिनाडा टाऊन-भावनगर एक्सप्रेस(काकिनाडा-सामलकोट-राजमुंद्री-विजयवाडा,सिकंदराबाद-सोलापूर-पुणे-कल्याण)
17204 फक्त दर गुरुवारी पहाटे ४:०० वाजता काकिनाडा येथून निघते.
दुसरया दिवशी शुक्रवारी पुणे येथे पहाटे २:०० वाजता व कल्याणला ५ वाजता पोहोचते.
पुणे,मुंबई,सोलापूर,उस्मानाबाद,रायगड

9) ओखा-पुरी एक्सप्रेस(मार्ग-राजकोट-अहमदाबाद-सुरत-नंदूरबार-जळगाव-भूसावळ-अकोला-वर्धा-विजयवाडा-सामलकोट)
18402 फक्त दर बुधवारी द्वारका येथून सकाळी ७:१५ वा.निघते.
सामलकोटला रात्री ११:०० वाजता पोहोचते.
धुळे,जळगाव,नंदूरबार,भूसावळ,विदर्भासाठी.

10) पुरी-ओखा एक्सप्रेस(पुरी-सामलकोट-वर्धा-भूसावळ-जळगाव-नंदूरबार)(पूरी येथून गाडी रविवारी सकाळी ८:४५ला निघते.
18401 फक्त दर रविवारी रात्री ८:०० वाजता सामलकोट येथून निघते.
भूसावळ येथे सोमवारी दुपारी ४:०० वाजता पोहोचते.
धुळे,जळगाव,नंदूरबार,भूसावळ,विदर्भासाठी.

11) दक्षिण एक्सप्रेस(मार्ग-दिल्ली-भोपाळ-नागपूर-काझिपेठ-विजयवाडा-सामलकोट)
12722 रोज रात्री १०:३० वाजता दिल्ली येथून निघते.
तिसरया दिवशी सकाळी १०:३० वाजता सामलकोटला पोहोचते.
चंद्रपूर,नागपूर,सेवाग्राम,विदर्भ.

Tuesday, April 19, 2011

भारतीय संस्कृतीचे रक्षण काळाची गरज
भारतात गेल्या काही दिवसांपासून पाश्चात्य संस्कृतीचा पगडा गडद होत आहे.पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण झपाट्याने होत असतांनाच ,समाजात अराजकता माजली आहे.शिवाय,व्याभिचारही बोकाळला आहे,वस्तुस्थितीत आजच्या घडीला पाश्चात्यांनाही भारतीय संस्कृतीची भूरळ पडायला लागली आहे.भारतीय संस्कृतीतील योग आणि सणांचा पाश्चात्यही अंगिकार करीत आहेत.इतकेच नव्हे तर ऎतिहासिक महत्त्व असलेल्या या संस्कृतीला विज्ञानाची सांगड असल्याचेही सिध्द झाले आहे.त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीचा अट्टाहास कशासाठी?असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.भारतीय समाजात झपाट्याने होत असलेल्या अंधानुकरणामुळे समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पाश्चात्य संस्कृतीमूळे भारतीय समाजात दुफळी निर्माण होत असल्याने भारतीय समाज घरा-घरात व गटा-गटात विभागला गेला आहे.पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतांना आम्ही आमचे आदर्श राष्ट्रपुरूष आणि इंग्रजांना तसेच परकीयांना सळो की पळो करणारया मातृशक्तीलाही विसरलो आहोत.राष्ट्रमाता मॉं जिजाऊ,क्रांतिकारी अहिल्याबाई होळकर,राणी लक्ष्मी,राणी झांसी,राणी तारामणी,रमाबाई आंबेडकर,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले,राणी दादी,डॉ.आनंदीबाई जोशी,कल्पना चावला व यांसोबतच मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद,महाराणा प्रताप,शाहू महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरूषांचाही आम्हाला विसर पडला आहे.भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर आदर्शच नव्हे तर महान असल्याचा प्रत्यय ठायी ठायी येत आहे.भारतीय संस्कृतीतील आदर्श पुरूष प्रभू रामचंद्र यांच्या कल्पक्तेचा आजच्या घडीला परिचय येत आहे.असं म्हणतात...जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी-मात्र या ऎतिहासिक ऒळीचाही आजच्या मातृशक्तीला विसर पडला आहे.समाजातील मातृशक्ती क्षणिक भौतिक सुखासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत असल्यामुळे समाजातील अनेक पिढ्या नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे.आदिमाया...पार्वती...लक्ष्मी..सरस्वतीच्या अंश असलेल्या मातृशक्तीने आपल्या मुलींच्या संरक्षणासाठी त्यांना भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्टये असलेली वस्त्रे परिधान करण्याचा आग्रह करावा.संस्कृती विघातक कृत्य टाळण्यासाठी आजच्या युवतींनी संकल्प करून अंगप्रदर्शन करणारी वस्त्रे टाळावीत.आधुनिक फैशनच्या नावावर बोकाळलेल्या संस्कृतीने आजच्या नवयुवतींवर अनेक प्रकारचे संकट येत आहेत.आधुनिक युगातील तंत्रज्ञानाला सर्वस्व मानत आम्ही त्यामागे धावत आहोत.परंतू,भारतीय संस्कृतीला विज्ञानाची सांगड होती,हे कदापी विसरून चालणार नाही.विज्ञान व तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी श्रध्दा व आस्था यालाही तेवढेच महत्त्व आहे.यासाठी संस्कारांची गरज आहे. व म्हणून भारतीय संस्कृतीचे संस्कार करून धर्मरक्षण करा व भारत देशाची प्रगती करून या लढ्यात सहभागी व्हा.जय महाराष्ट्र!

Sunday, April 17, 2011

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥

आरती व भजनावली संग्रह

माला कमंडलु रध:कर पद्म युग्मे।मध्यस्त पाणि युगुले डमरु त्रिशुले।
यस्यस्त ऊर्ध्व करयो शुभ शंख चक्रे।वंदेतम् अत्रि वरद भुज षटक् यत्त्कम॥

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ

काषायवस्त्रं करदंड धारिणं। कमंडलु पद्म करेण शंखम्।
चक्रं गदा भूषितं भूषणाढ्यं। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये॥

भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज

औदुंबरा तळवटी नरसिंह योगी।कृष्णातटी परम शांत सुखास भोगी॥
ध्यानस्त होऊनि समस्त चरित्र पाहे।अन्यन्य जो शरण इच्छित देत आहे॥

प्रार्थना

ब्रम्हानंदं परम् सुखदं केवलं ज्ञानमूर्तीम्।
द्वंद्वातीतम् गगन सद्दशं तत्वमस्यादि लक्षम्॥
एकम् नित्यम् विमल मचलम् सर्वधी साक्षी भूतम।
भावातीतम त्रिगुण रहितम् सदगुरुम् तं नमामी॥
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:।
गुर्रुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:॥

गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सदगुरु।
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सदगुरु।।

करुणापंचपदी

भजन-1

शांत हो श्रीगुरुदत्ता। ममचित्ता शमवी आता॥
तू केवळ माता जनिता। सर्वथा तू हितकर्ता।
तू आप्त स्वजन भ्राता। सर्वथा तूची त्राता॥
भयकर्ता तू भयहर्ता। दंड धरिता तू परिपाता।
तुज वाचुनी न दुजी वार्ता। तू आर्ता आश्रय दत्ता॥
मम चित्ता शमवी आता। शांत हो श्रीगुरुदत्ता॥धृ॥

अपराधास्तव गुरुनाथा। जरी दंडा धरिसी यथार्था।
तरी आम्ही गावूनी गाथा। तव चरणी नमवू माथा॥
तु तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करु धावा।
सोडविता दुसरा तेंव्हा। कोण दत्ता आम्हा त्राता॥
मम चित्ता शमवी आता। शांत हो श्रीगुरुदत्ता॥धृ॥

तू नटसा होवूनी कोपी। दंडिताही आम्ही पापी।
पुनरपिही चुकतां तथापि। आम्हावरी नच संतापी॥
गच्छत:स्खलनं क्वापी। असे मानुनी नच हो कोपी।
निज कृपा लेषा ओपी। आम्हावरी तु भगवंता॥
मम चित्ता शमवी आता। शांत हो श्रीगुरुदत्ता॥धृ॥

तव पदरी असतां ताता। आडमार्गी पाऊल पडता।
सांभाळूनी मार्गा वरिता। आणिता न दुजा त्राता॥
निज बिरुदा आणुनि चित्ता। तु पतित पावन दत्ता।
वळे आतां आम्हां वरतां। करुणा घन तूं गुरुनाथा॥
मम चित्ता शमवी आता। शांत हो श्रीगुरुदत्ता॥धृ॥

सहकुटूंब सहपरिवार। दास आम्ही हे घरदार।
तवपदी अर्पू असार। संसाराहीत हा भार॥
परि हरिसी करुणा सिंधो। तूं दिनानाथ सुबंधो।
आम्हा अघलेष न बाधो। वासुदेव प्रार्थीत दत्ता॥
मम चित्ता शमवी आता। शांत हो श्रीगुरुदत्ता॥धृ॥

भजन-2
श्री गुरुदत्ता जय भगवंता- जय भगवंता।
ते मन निष्ठूर न करिं आतां। श्री गुरुदत्ता॥धृ॥

चोरे द्विजासी मारिता मन जे।
कळकळलें ते कळकळों आतां। श्री गुरुदत्ता॥१॥

पोट शुळाने द्विज तडफडतां।
कळवळलें ते कळवळो आतां। श्री गुरुदत्ता॥२॥

द्विज सुत मरतां वळले ते मन।
हो कीं उदासिन न वळे आतां। श्री गुरुदत्ता॥३॥

सती पती मरतां काकुळती येतां।
वळलें ते मन न वळे आतां। श्री गुरुदत्ता॥४॥

श्री गुरुदत्ता त्यजी निष्ठुरता।
कोमल चित्ता वळवी आतां।श्री गुरुदत्ता॥५॥


भजन-3
जय करुणाघन निज जन जिवन।
अनुसया नंदन पाही जनार्दन। जय करुणाघन॥धृ॥

निज अपराधे ऊफराटी दृष्टी।
होऊनी पोटी भय धरूं पावन। जय करुणा घन ॥१॥

तूं करुणाकर कधी आम्हांवर।
रुससि न किंकर वरद कृपा घन। जय करुणा घन ॥२॥

वारी अपराध तूं माय-बाप।
तव मनी कोप लेष न वामन। जय करुणा घन॥३॥

बालकापरधा गणे जरि माता।
तरी कोण त्राता देईल जीवन। जय करुणा घन॥४॥

प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव।
पदि देवो ठाव देव अत्रिनंदन। जय करुणा घन॥५॥

 भजन-४  

धाव पाव दिनबंधू श्री दत्त देवा॥धृ॥
कमंडलू माळकरी-डमरु त्रिशुळासी धरी।
शंखचक्र भवहारी-द्यावी पाय सेवा। श्री दत्त देवा॥१॥

त्रयमुर्ती विराजितां-रसिक भाव भक्त हिता।
अहं मम जीवी धरितां-वारिता जन्म मेवा। श्री दत्त देवा॥२॥

कलीयुगी भक्त प्रिती-होऊनी श्रीपाद यती।
रक्षी नृसिंह सरस्वती-अर्पी प्रेम सेवा। श्री दत्त देवा॥३॥

धुसर कांती दिव्य राज-विभुती अंगी दिव्य साज।
भक्त जना पूर्ण काज-तुची गुप्त ठेवा। श्री दत्त देवा॥४॥

 
भजन-५

माझ्या दत्ता अवधुता ब्रम्हचारी-हो
माझ्या दत्ता अवधुता ब्रम्हचारी।
राहे साहे माहुर गडावरी।माझ्या दत्ता॥धृ॥

प्रात:स्नाना येतसे भागिरथी-हो॥
माध्यान्हकाळी जाई तो गोदा तटी-हो॥
साय़ंकाळी स्वयंभू ज्याची मुर्ती।माझ्या दत्ता॥१॥

भिक्षा करी कह्राड कोल्हापूरी-हो॥
नेऊन भक्षी रंकाळ तळ्यावरी-हो॥
निद्रा करी अवधुत गिरीवरी।माझ्या दत्ता॥२॥

ऐसा दत्त-दत्त हा योगीराणा-हो॥
अनुसुयेचे पोटी बाळ तान्हा-हो॥
माधवदासांसी नित्य दर्शन देई।माझ्या दत्ता॥३॥

 
भजन-६

पायघडी घाली-दत्ताची पालखी आली॥धृ॥
ब्रम्हानंद स्वामिने मंत्रची दिधले। श्रोते भजनासी लावियले॥
पंचभुताचे सार काढिले। कायावस्त्र धूवून काढिले॥
जडिताची केली। दत्ताची पालखी आली॥१॥

नवरंगाचे पातळ लेवूनी। स्वकरे पायघडी घालोनी॥
त्रयमुर्ती चाले ज्याचे वरुनी
मौज पाहिली। दत्ताची पालखी आली॥२॥

मन कायेचा पितांबर। पायघडी दिसे बहु सुंदर॥
वरदत्त चालती दिगंबर।
अनुसया माऊली। दत्ताची पालखी आली॥३॥

पहाते नरसिंह सरस्वती। पुढे उभी दत्ताची मुर्ती॥
मनुकावरते चरणावरती।
लोटांगण घाली। दत्ताची पालखी आली॥४॥

भजन-
दत्त बोल दत्त बोल दत्त गुरु बोल। श्रीपाद श्री वल्लभ तूं बोल॥
अत्रिसूत त्रैमुर्ती ध्यन मे तूं डोल।अनुसुया सुत गुरु अवधुत बोल॥१॥
योगिराज देखने तूं आंखे खोल। त्रिताप हारक दत्त नाम बोल॥२॥
सिध्द दत्तराज गुरु यतिराज बोल।पिठापूरवासी योगी श्रीपाद बोल॥३॥
योगश्री पती श्री वल्लभ बोल। श्रीपाद श्री वल्लभ तूं बोल॥४॥
नृसिंहसरस्वती ध्यान मे तूं डोल। भवभय हारक दत्त नाम बोल॥५॥
रामप्रभु छ्बी नित मनमे घोल। श्रीपाद श्रीवल्लभ तूं बोल॥६॥

दत्ताचे पद

भाव फुलांची माला-माला भाव फुलांची माला।
अर्पिन माझ्या गुरुरायाला।भाव फुलांची माला॥धृ॥

देव्हारामधे सुंदर मुर्ती।
चित्ती वसू दे ही त्रयमुर्ती॥
स्फुर्ति चढू दे हरी भजनाला।भाव फुलांची माला॥१॥
भक्तीचा तो धागा घेऊनी।
प्रेमाची ती फुले वेचुनी॥
एक स्वरूपी मिळविन त्याला।भाव फुलांची माला॥२॥

अज्ञानाची करूनी वात।
ज्ञानाची ती ऊजळूनी ज्योत॥
प्रेमभरे मी पाहीन प्रभुला।भाव फुलांची माला॥३॥

तारा म्हणे हो सदगुरु देवा।
सांभाळ माझा प्रभू तू करावा॥
अव्हेरु नको तू ह्या लेकराला।भाव फुलांची माला॥४॥

सिध्दमंगल स्तोत्रम

श्री मदनंत श्रीविभीषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

सवित्रृकाठकचयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

दौ चौपाती देव लक्ष्मी धनस्ख्या बोधित श्रीचरणा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल संजाता।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

सुमतीनंदन नरहरिनंदन दत्तदेवप्रभु श्रीपादा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

पीठिकापुर नित्यविहारा मधुमति दत्ता मंगलरूपा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अष्टक स्तोत्र

इंदु कोटि तेजकीर्ण सिंधुभक्त वत्सलं।
नंदनासुनंदनेंदु इंदिराक्ष श्री गुरुम्।
गंध माल्य अक्षतादि वृंद देव वंदितं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥१॥

माया पाश अंध:कार छायादूर भास्करं।
आयताक्षी पाहि श्रीयावल्ल्भेश नायकं।
सेव्य भक्ती वृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥२॥

चित्तजादि वर्गषटक मत्तवारणां कुशं।
तत्वसार शोभीतात्म दत्त श्री वल्लभं।
उत्तमावतार भूत कर्तू भक्त श्री वत्सलं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥३॥

व्योम रवी वायु तेज भूमी कर्तुमीश्वरं।
काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचनं।
कामितार्थ दांतभक्त कामधेनू श्री गुरुं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥४॥

पुंडरीक आयताक्ष कुंड्लेंदु तेजसं।
चंडदुरीत खंडनार्थ दंडधारी श्री गुरुं।
मंडलीक मौलीमार्तंड भासिता नं नं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।५॥

वेदशास्त्र स्तुत्य पाद आदिमूर्ती श्री गुरुं।
नादकलातीत कल्प पाद पाय सेव्ययं।
सेव्य भक्ती वृंदवरद भूयो भूयो नमाम्य हं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।६॥

अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्ट ज्ञान नवारिधीं।
कृष्णा वेणीतीर वास पंच नद्य संगमं।
कष्ट दैन्य दूर भक्त तुष्ट काम्य दायकं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।७॥

नारसिंह सरस्वतीश नाम अष्ट मौक्तिकं।
हार कृत्य शारदेन गंगाधराख्या स्यात्मजं।
वारुणीक देवदिक्ष गुरुमुर्ती तोषितं।
परमात्मा नंदश्रीया पुत्रपौत्र दायकं।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।८॥

नारसिंह सरस्वतीश अष्टकंच य: पठेत।
घोर संसार सिंधु तारण्याख्य साधनं।
सारज्ञान दीर्घ मायुरारोग्यादि संपदाम।
चातुर्वर्गकाम्य लोका वारंवार य: पठेत।
वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाहिमां॥।९॥

 शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्र्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ॥
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ॥
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥

श्रीरामरक्षास्तोत्र 

              ॐ श्रीगणेशाय नमः

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य . बुधकौशिक ऋषिः .
श्रीसीतारामचंद्रो देवता . अनुष्टुप् छंदः .
सीता शक्तिः . श्रीमद् हनुमान कीलकम् .
श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ..
    .. अथ ध्यानम् ..
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम् .
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् .
वामांकारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् .
नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामंडनं रामचंद्रम् ..

   .. इति ध्यानम् ..

चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् .
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् .. १..

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् .
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम् .. २..

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् .
स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतं अजं विभुम् .. ३..

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् .
शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजः .. ४..

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुती .
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः .. ५..

जिव्हां विद्यानिधिः पातु कंठं भरतवंदितः .
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः .. ६..

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् .
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः .. ७..

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः .
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् .. ८..

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः .
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोखिलं वपुः .. ९..

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् .
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् .. १०..

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः .
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः .. ११..

रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् .
नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति .. १२..

जगजैत्रैकमंत्रेण रामनाम्नाभिरक्षितम् .
यः कंठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः .. १३..

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत् .
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम् .. १४..

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षांमिमां हरः .
तथा लिखितवान् प्रातः प्रभुद्धो बुधकौशिकः .. १५..

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् .
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः .. १६..

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ .
पुंडरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ .. १७..

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ .
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ .. १८..

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् .
रक्षः कुलनिहंतारौ त्रायेतां नो रघूत्तमौ .. १९..

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ .
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् .. २०..

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा .
गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः .. २१..

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली .
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः .. २२..

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः .
जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः .. २३..

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः .
अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः .. २४..

रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् .
स्तुवंति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः .. २५..

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् .
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् .
राजेंद्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिम् .
वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् .. २६..

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे .
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः .. २७..

श्रीराम राम रघुनंदन राम राम .
श्रीराम राम भरताग्रज राम राम .
श्रीराम राम रणकर्कश राम राम .
श्रीराम राम शरणं भव राम राम .. २८..

श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि .
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि .
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि .
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये .. २९..

माता रामो मत्पिता रामचंद्रः .
स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः .
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः .
नान्यं जाने नैव जाने न जाने .. ३०..

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा .
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम् .. ३१..

लोकाभिरामं रणरंगधीरम् .
राजीवनेत्रं रघुवंशनाथम् .
कारुण्यरूपं करुणाकरं तम् .
श्रीरामचंद्रम् शरणं प्रपद्ये .. ३२..

मनोजवं मारुततुल्यवेगम् .
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् .
वातात्मजं वानरयूथमुख्यम् .
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये .. ३३..

कूजंतं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् .
आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम् .. ३४..

आपदां अपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् .
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् .. ३५..

भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदाम् .
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् .. ३६..

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे .
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः .
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम् .
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर .. ३७..

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे .
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने .. ३८..

इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ..

    .. श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ..

गणपती स्तोत्र-नारदपुराणातील

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥


श्री मधुराष्टकं 


अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरम् ।
हृदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥

वचनं मधुरं चरितं मधुरं
वसनं मधुरं वलितं मधुरम् ।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः
पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥

गीतं मधुरं पीतं मधुरं
भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।
रुपं मधुरं तिलकं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥

करणं मधुरं तरणं मधुरं
हरणं मधुरं स्मरणं मधुरम् ।
वमितं मधुरं शमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥

गुञ्जा मधुरा माला मधुरा
यमुना मधुरा वीची मधुरा ।
सलिलं मधुरं कमलं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥

गोपी मधुरा लीला मधुरा
युक्तं मधुरं भुक्तं मधुरम् ।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥

गोपा मधुरा गावो मधुरा
यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।
दलितं मधुरं फलितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥

॥ इति श्री महाप्रभुवल्लभाचार्यविरचितं श्री मधुराष्टकं सम्पूर्णम् ॥

भीमरुपीस्तोत्र

भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥२॥

दीनानाथा हरीरुपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका ॥४॥

ध्वजांगे उचली बाहो आवश लोटता पुढे ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥

ब्रह्मांडे माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुर्डिलें माथा किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळें ॥९॥

आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकीले मागे गतीसी तुळणा नसे ॥१०॥

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरु मंदार धाकुटे ॥११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करुं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदीलें शून्यमंडळा ॥१३॥

धनधान्य पशुवृध्दि पुत्रपौत्र समस्तही ।
पावती रुपविद्यादि स्तोत्रपाठेंकरूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंद भीमदर्शनें ॥१५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥१६॥

रामदासी अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१७॥

॥ इति श्रीरामदासकृतसंकटनिरसन मारुतीस्तोत्रं संपूर्णम् ॥

शिवस्तुती(मराठी)

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

रवींदुदानावल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥

जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥

वैराग्य योगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥

उदारमेरु पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।
भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महविदारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥

कपूरगौरी गिरीजा विराजे ।
हळाहळें कंठ निळाच साजे ।
दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे ।
तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा ।
तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥

नंदी हराचा हर नंदिकेश ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥

भयानक भीम विक्राळ नग्न ।
लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥

इच्छा हराची जग हे विशाळ ।
पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥

भागीरथीतीर सदा पवित्र ।
जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या ।
पदारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना ।
कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता ।
तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥

सदा तपस्वी असे कामधेनु ।
सदा सतेज शतकोटी भानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसावा ।
चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहितसुचना विचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥

विरामकाळी विकळे शरीर ।
उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनि चित्तहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥

सुखावसानीं सकळें सुखाची ।
दुःखावसानी टळती जगाचीं ।
देहावसानी धरणी थरारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥

अनुहतशब्द गगनी न माय ।
तिचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥

शांतिस्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।
शोभा जडीत वरि किंकिणींची ।
श्रीवेददत्त दुरितान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥

जिवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥

निदान कुंभ भरला अभंग ।
पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥

जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळा मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे ।
संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा ।
मना जप रे शिवयंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥

एकान्ति ये रे गुरुराजस्वामी ।
चैतन्यरुपी शिव सूखनामी ।
शिणलों दयाळा बहुसाळ भारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥

शास्त्राभ्यास नको व्रतें मख नका तीव्रें तपें ती नको ।
काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकू नका ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥

श्री गणपती अथर्वशिर्ष 

ॐ नमस्ते गणपतये| त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि| त्वमेव केवलं कर्ताऽसि| त्वमेव केवलं धर्ताऽसि| त्वमेव केवलं हर्ताऽसि| त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि| त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्॥१॥ 

ऋतं वच्मि| सत्यं वच्मि॥२॥

अव त्वं माम्| अव वक्तारम्| अव श्रोतारम्| अव दातारम्॥ अव धातारम्| अवानुचानमव शिष्यम्| अव पश्चात्तात्| अव पुरस्तात्| अवोत्तरात्तात्| अव दक्षिणात्तात्| अव चोर्ध्वात्तात| अवाधरात्तात्| सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्॥३॥

त्वं वाङमयस्त्वं चिन्मय:| त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममय:| त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि| त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि| त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥४॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते| सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति| सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति| सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति| त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:| त्वं चत्वारि वाक्पदानि॥५॥

त्वं गुणत्रयातीत:| त्वमवस्थात्रयातीत:| त्वं देहत्रयातीत:| त्वं कालत्रयातीत:| त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्| त्वं शक्तित्रयात्मक:| त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्| त्वं ब्रह्माःस्त्वं विष्णुःस्त्वंरुद्रस्त्वंइंद्रस्त्वं अग्निस्त्वंवायुस्त्वंसूर्यस्त्वंचंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्॥६॥

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम्| अनुस्वार: परतर:| अर्धेन्दुलसितम्| तारेण ऋध्दम्| एतत्तव मनुस्वरूपम्| गकार: पूर्वरुपम्| अकारो मध्यमरूपम्| अनुस्वारश्चान्त्यरुपम्| बिन्दुरुत्तररुपम्| नाद: सन्धानम्| संहिता सन्धि:| सैषा गणेशविद्या| गणक ऋषि:| निचृदगायत्रीच्छन्दः| गणपतिर्देवता|
ॐ गं गणपतये नम:॥७॥

एकदंताय विद्महे| वक्रतुण्डाय धीमहि| तन्नो दंती प्रचोदयात्॥८॥

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्| रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्| रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्| रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्| भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्| आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते: पुरुषात्परम्| एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:॥९॥

नमो व्रातपतये| नमो गणपतये| नम: प्रमथपतये| नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदन्ताय| विघ्ननाशिने शिवसुताय| श्रीवरदमूर्तये नमो नम:॥१०॥

फलश्रुति

एतदथर्वशीर्षं योऽधिते| स ब्रह्मभूयाय कल्पते| स सर्वविघ्नैर्न बाध्यते| स सर्वत: सुखममेधते| स पञ्चमहापापात्प्रमुच्यते| सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति| प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति|
सायं प्रात: प्रयुञ्जानो अपापो भवति| सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति| धर्मार्थकाममोक्षं च विंदति| इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्| यो यदि मोहाद्दास्यति| स पापीयान् भवति| सहस्त्रावर्तनात्| यं यं काममधीते| तं तमनेन साधयेत्॥११॥

अनेन गणपतिमभिषिंचति| स वाग्मी भवति| चतुर्थ्यामनश्नन् जपति| स विद्यावान् भवति| इत्यथर्वण-वाक्यम्| ब्रह्माद्यावरणं विद्यात्| न बिभेति कदाचनेति॥१२॥

यो दूर्वांकुरैर्यजति| स वैश्रवणोपमो भवति| यो लार्जैर्यजति स यशोवान् भवति| स मेधावान् भवति| यो मोदकसहस्त्रेण यजति| स वाञ्छितफलमवाप्नोति| य: साज्यसमिभ्दिर्यजति| स सर्वं लभते| स सर्वं लभते॥१३॥

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति| सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्ता| सिध्दमंत्रो भवति| महाविघ्नात् प्रमुच्यते| महादोषात् प्रमुच्यते| महापापात् प्रमुच्यते| स सर्वविद् भवति| स सर्वविद् भवति| य एवं वेद| इत्युपनिषत्॥१४॥

ॐ सह नाववतु| सह नौ भुनक्तु| सह वीर्यं करवावहै| तेजस्विनावधीतमस्तु| मा विद्विषावहै| ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः| भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः| स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तभूनुभिः| व्यशेम् देवहितं यदायुः॥१॥

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः| स्वस्ति नः पुषा विश्ववेदाः| स्वस्ति नसतार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥२॥

ॐ शान्तिः| शान्तिः| शान्तिः॥महालक्ष्मी अष्टक

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |शङ्‌खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥१॥

नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्‌करि |सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥२॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्‌करि |सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥३॥

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी | मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥४॥

आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्‍वरी | योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥५॥

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे | महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥६॥

पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी | परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥

श्वेताम्बरधरे देवी नानालङ्‌कारभूषिते | जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥८॥

महालक्ष्माष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः | सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् ‌| द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्‌ | महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥


श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् 
जटाधरं पांडुरांगं शूलहस्तं कृपानिधिम् । 
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥ 
अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमंत्रस्य भगवान् नारदऋषिः । अनुष्टुप् छन्दः । 
श्रीदत्तपरमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ 
जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे ।
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥ 
जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च ।
दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥ 
कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । 
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥ 
र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित । 
पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥ 
यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च। 
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥ 
आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरंते देवः सदाशिवः।
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥ 
भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे। 
जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥ 
दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च।
सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥ 
जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनिवासिने। 
जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥ 
भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे। 
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥ 
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले। 
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥ 
अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे। 
विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥ 
सत्यंरूपसदाचारसत्यधर्मपरायण। 
सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १३॥ 
शूलहस्तगदापाणे वनमालासुकन्धर। 
यज्ञसूत्रधरब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १४॥ 
क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च।
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १५॥ 
दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे।
गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १६॥ 
शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम्।
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १७॥ 
इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम्।
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥ १८॥ 
|| इति श्री नारदपुराणे नारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम || 
गणेश आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ।। धृ ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा
रुणझुणती नूपूरे चरणी घागरिया ।। २ ।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।


देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांते वारी
हारी पडलों आतां संकट निवारी ॥१॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी
सुरवर-ईश्वरवरदे तारक संजिवनी ॥धृ॥

त्रिभुवन भुवनी पाहतां तुजऐशी नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करितां पडले प्रवाही
ते तु भक्तांलागी पावसि लवलाही ॥२॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां
क्लेशांपासुनि सोडविं तोडीं भवपाशा
अंबे तुजवांचुन कोण पुरविल आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥


महालक्ष्मीची आरती

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥

करविरपुरवासिनी सुरवरमुनि-माता
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता
कमलाकरे‍ जठरी जन्मविला धाता
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री निजबीजा निगमागम सारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृत-भरिते सरिते अघदुरितें वारीं
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं
वारी मायापटल प्रणमत परिवारी
हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥

जयदेव जयदेव जय श्रीशंकरा
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ॥धृ॥

कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥

देवी दैत्यी सागर मंथन पैं केले
त्यामाजी अवचित हळहळ जें उठलें
तें त्वां असुरपणें प्राशन केले
'नीलकंठ' नाम प्रसिध्द झाले ॥ ३॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥४॥

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य-राणा
नेति नेति शब्दें न ये अनुमाना
सुरवरमुनिजनयोगिसमाधि न ये ध्याना ॥१॥

जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता
आरती ओंवाळितां हरली भवचिंता ॥धृ॥

सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त
अभाग्यासी कैची कळेल ही मात
पराहि परतलि तेथें कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥

दत्त येऊनिया उभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥

'दत्त दत्त' ऐसे लागले ध्यान
हारपले मन झाले उन्मन
मी-तुंपणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥

दत्ताची आरती


जयदेव जयदेव जय, श्रीमान अवधूता
आरती ओवाळी तुजला, बाळ उमासुता

माहूरगड असे तुझे, पावन जन्मस्थान
दर्शनास येती भक्त, गात तुझे गुणगान
घेऊन दर्शन तुझे, मिटवती  ते  तहान
कृपा करसी त्यावर, आहेस फार महान

गाणगापूर असे तुझे, एक वसती स्थान
येती भक्त तुझे, करती भावे तीर्थ स्नान
स्नान करुनी भक्त, घेतात तुझे दर्शन
भिक्षा मागुनी गावात , करती ते भोजन
भूतबाधा, चिंता, खूप घेऊन येती भक्तगण
पीडा आपुल्या मिटवती, येती तुला शरण

भक्ताच्या हृदयात असे , सदा तुझा वास
नृसिंहवाडीस येती, त्याना लाभे सहवास
अनुष्ठान करे वाडीस, घेती तुझे जपनाम
समाधान पावती जेंव्हा, होई पूर्ण ते काम

पावन स्थानापैकी एक, असते हो औदुंबर
चुकवत नसे दर्शन, तुझे ते भक्त दिगंबर
हजार पायऱ्या चढून, येती भक्त गिरनारास
विसरती कष्ट देहाचे, घेताच तव दर्शनास

कृपा तुझी आम्हावर, राहो देवा दत्तात्रया
विसरणार नाही तुला, या तिन्ही कालत्रयामारुतीची आरती

सञाणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥
कडाडीले ब्रम्हांड धोका ञिभुवनी ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥

जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता ।
तुमचेनि प्रसादें न भियें कृतांता ॥धृ॥

दुमदुमिले पाताळ उठिला पडशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ॥
काडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीरामदासा शक्तीचा शोध ॥२॥
-----------------------------------------------


विठ्ठलाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ जय देव जय देव ॥धृ॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥२॥

धन्य वेणुनाद अनुक्षेञपाळा ।
सुवर्णांची कमळें वनमाळा गळां ॥
राही रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमांजी स्नानें जे करिती ।
दर्शनहेळामाञें तयां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओंवाळिती ॥५॥साईबाबांची आरती

आरती साईबाबा ।
सौख्यदातारा जीवा ।
चरणरजतळीं निज दासां विसावां ।
भक्तां विसावा ॥धृ॥

जाळुनियां अनंग ।
स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजना दावी ।
निजडोळां श्रीरंग ॥१॥

जया मनीं जैसा भाव ।
तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना ।
ऐसी ही तुझी माव ॥२॥

तुमचें नाम ध्यातां ।
हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी ।
मार्ग दाविसी अनाथा ॥३॥

कलियुगीं अवतार ।
सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे ।
स्वामी दत्त दिगंबर ॥४॥

आठा दिवसां गुरुवारी ।
भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ॥५॥

माझा निजद्रव्य ठेवा ।
तव चरणसेवा ।
मागणें हेंचि आता ।
तुम्हा देवाधिदेवा ॥६॥

इच्छित दीन चातक ।
निर्मळ तोय निजसुख ।
पाजावें माधवा या ।
सांभाळ आपुली भाक ॥७॥

अक्कलकॊट स्वामी समर्थांची आरती

जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था ।
आरती ओवाळूं चरणी ठेवुनियां माथा ॥धृ॥

छेली खेडेग्रामीं तूं अवतरलासी ।
जगदुद्धारासाठीं राया तू फिरसी ।
भक्तवत्सल खरा तूं एक होसी ।
म्हणुनि शरण आलों तुझे चरणासी ॥१॥

ञैगुणपरब्रह्म तूझा अवतार ।
त्याची काय वर्णूं लीला पामर ।
शेषादिक शिणले ।
नलगे त्या पार ।
तेथें जडमूढ कैसा करुं मी विस्तार ॥२॥

देवादीदेव तूं स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां ।
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारीं तूं स्वामीराया ॥३॥

अघटित लीला करूनीं जडमूढ उद्धरिले ।
कीर्ती ऐकुनि कानी चरणीं मी लोळें ।
चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें ।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळें ॥४॥

आरती दत्ताची

श्रीगुरुदत्त राजमुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती ।। धृ ।। 
ब्रह्मा विष्णू शंकराचा । असे अवतार श्री गुरूचा ।। 
कराया उद्धार जगताचा । जाहला बाळ अत्री ऋषीचा ।। 
धरीला वेश असे यतीचा । मस्तकी मुकुट शोभे जटीचा ।। 
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुत वरुनी तेणे भक्तांचे क्लेश हरूनि
त्यासी करुनी नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती ।। १ ।।
गांणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेची ।
भीमा अमरजा संगमाची, भक्ती असे बहुत सुशिष्यांची ।
वाट दावूनिया योगाची । ठेव देतसे निजभक्तीची ।। 
काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भिक्षेला जातो, माहूर निद्रेला वरितो ।।
तरतरतरित छाती धर धरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूल जया हाती ।। ओवाळीतो ।। ।। २ ।।
अवधूत स्वामी सुखानंदा । ओवाळीतो सौख्य कंदा 
तारी हा दास न रजकंदा सोडवी विषय मोहछंदा
आलो शरण अत्रीनंदा दावी सदगुरू ब्रम्हानंदा ।। 
चुकवी चौर्यान्शीचा फेरा । घालिती षडरिपू मज घेरा, गांजिती पुत्रपौत्रदारा
वदवी भजन मुखी तव पूजन करीत हे सुजन जयाचे बलवन्तावरती ओवाळीतो…


|| श्रीतुळसीची आरती ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी |
अग्रीँ शंकर तीर्थे शाखापरिवारीँ |
सेवा करिती भावें सकळही नरनारी |
दर्शनामात्रें पापें हरती निर्धारीं || १ ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी |
तव दलविरहित विष्णूं राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीँ || २ ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळीं जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावी सुत विनवी मजला तूं तारीं || ३ ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

आरती श्रीएकनाथांची
आरती एकनाथा।महाराजा समर्था॥
त्रिभुवनी तूचि थोर।जगद्गुरु जगन्नाथा॥धृ॥
एकनाथ नामसार।वेदशास्त्रांचे गूज॥
संसारदु:ख नासे।महामंत्राचे बीज॥१॥
एकनाथनाम घेता।सुख वाटले चित्ता।
अनंत गोपाळदासा।धणी न पुरे आता॥२॥

आरती श्रीतुकारामांची
आरती तुकारामा।स्वामी सद्गुरुधामा।
सच्चिदानंदमूर्ती।पाय दाखवी आम्हा॥धृ॥
राघवे सागरात।पाषाण तारिले
तैसे हे तुकोबाचे।अभंग उदकी रक्षिले॥१॥
तुकिता तुलनेसी।ब्रह्म तुकासी आले॥
म्हणोनि रामेश्वरे।चरणी मस्तक ठेविले॥२॥

आरती समर्थांची
आरती रामदासा।भक्तविरक्त ईशा॥
उगवला ज्ञानसूर्य।उजळोनी प्रकाशा॥धृ॥
साक्षात शंकराचा।अवतार मारूती॥
कलिमाजी तेचि झाली।रामदासांची मूर्ती॥१॥
वीसही दशकांचा।दासबोध ग्रंथ केला॥
जडजीवा उध्दरीले।नृप शिवासी तारिले॥२॥
ब्रह्मचर्य व्रत ज्याचे।रामरूप सृष्टि पाहे।
कल्य़ाण तिही लोकी।समर्थ सद्गुरुपाय॥३॥


घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रुप तुझे ॥
प्रेमें आलिंगिन आनंदे पूजीन ।
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥मंत्र पुष्पांजलि

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासान्।
ते ह नाकं महिमान: सचंत।
यत्र पुर्वे साध्या: संति देवा:।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:।
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्।
पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिती।
तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्सावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति॥