Thursday, March 8, 2012

॥श्री संत गजानन महाराजाष्टक॥


संतकवी श्री दासगणू महाराज विरचित
॥श्री संत गजानन महाराजाष्टक॥


गजानन गुणागरा परम मंगल पावना॥
अशीच अवघे हरी दुरित दुर्वासना॥
नसे त्रिभुवनामध्ये तुजविणे आम्हां आसरा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥१॥


निरालसपणे नसे घडली अल्प सेवा करी॥
तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरीं॥
विसंबत न गाय ती आपुलिया कधी वासरा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥२॥


अलास जगी लावण्या परतुनी सु-वाटे जन॥
समर्थ गुरुराज ज्या भूषवि नाम नारायण॥
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडूनिया करा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥३॥


क्षणांत जल आणिले नसुन थेंब त्या वापिला॥
क्षणांत गमनाप्रती करीसी ईच्छिलेल्या स्थळा॥
क्षणांत स्वरूपे किती विविध धारिसी धीवरा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥४॥


अगाध करणी तुझी गुरुवरा न लोका कळे॥
तुला त्यजुन व्यर्थ ते अचरितात नाना खुळे॥
कृपा उदक मागती त्यजुन गौतमीच्या तिरा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥५॥


समर्थ स्वरूपाप्रती धरून साच बाळापुरी॥
तुम्ही प्रकट जाहला सुशिल बाळकृष्णा घरी॥
हरि स्वरूप घेऊन दिधली भेट भीमातीरा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥६॥


सच्छिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागता॥
जलात बुडता तरी तिजसि नर्मदा हे हाता॥
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥७॥


अतां न बहु बोलता तव पदांबुजा वंदितो॥
पडो विसर न कदा मदिय हेच मी मागतो॥
तुम्ही वरद आपुला कर धरा गणुच्या शिरा॥
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा॥८॥No comments:

Post a Comment